39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करण्याची गरज : आ. विजय रहांगडाले

शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करण्याची गरज : आ. विजय रहांगडाले

0
42

blank

तिरोडा : छत्रपती शिवराय यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक दिली. परस्त्रीचा नेहमी सन्मान केला. शेतकर्‍यांना शून्य दराने व्याजासह इतर अनेक सोयीसुविधा देवून सुराज्य घडविले. अशा शिवरायांचे गुण आत्मसात करून एका नवसमाजाची निर्मिती करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी केले.

तालुक्याच्या चांदोरी खु. येथे शुक्रवार, 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.

अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चितामन रहांगडाले होते. दीप प्रज्वलन माजी उपसभापती डॉ. वसंत भगत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती डॉ. योगेंद्र भगत, चतुर्भुज बिसेन, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे, अलकेश मिश्रा, श्रावन रांहगडाले, भाजप महिला अध्यक्ष माधुरी राहंगडाले, नेहा बिसेन, ममता बाविसताले, पवन पटले, नत्थु अंबुले, राधेलाल बिसेन, देवेंद्र तिवारी, सेवक अंबुले, इस्तारु नखाते, भाऊलाल अंबुले, हेमराज जमईवार,सुनील बारापात्रे, गुडु लिल्हारे, डॉ.डुलीचंद पटले, नामदेव जमईवार, राजेश रहांगडाले, तारेद्र अंबुले, शाहिल मालाधारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराज सघांचे सर्व कार्यक्रर्ते, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. आमदार विजय रहांगडाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज पटांगणात सभागृह देण्याची घोषणा केली केली व इतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

प्रास्ताविक व आभार हुपराज जमईवार यांनी केले. संचालन लोकेश तितिरमारे यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल वैद्य, रोहीत जमईवार, अरविंद अंबुले, सन्नी जमईवार, विवेक बाविसताले, शाहरूख मालाधारी, नितेश गोंदुळे, आशिष मेश्राम, कृष्णा मेश्राम, गुडु जमईवार, मनीष बिसेन, चिंटू भोयर, धमेद्र बिसेन, अतुल तितीरमारे, अरुण वैद्य, दीपक अंबुले, भारत बाविसताले, गोलु पाल्हेवार, तिर्थन अंबुले, राकेश सूर्यवंशी, अरविंद शिवांकर, विक्की बान्ते, आशिक वालदे, मराठे, राहूल शेन्डे, यंशवंत तितीरमारे, पवन शेन्डे, गोलु मालाधारी, अनिल अंबुले, मनिष नखाते, कार्तिक मेश्राम, संतोष बान्ते व छत्रपती शिवाजी संघाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

blank