35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता देवरी पोलीसांकडून प्रतिबंधीत पान मसालासह चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त

देवरी पोलीसांकडून प्रतिबंधीत पान मसालासह चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त

0
80

blank

चिचगड/देवरी,दि.10ः- छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून अमरावतीकरीता निघालेल्या एका ट्रकमध्ये प्रतिबंधीत असलेला पान पराग व मसाल्याची वाहतुक होत असल्याची माहिती पोलिसांना गुप्तहेराकडून मिळाली.त्या माहितीच्या आधारे देवरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रेवंचद सिंगणजुडे यांनी आपल्या सहकारी कर्मचार्यासह चिचगड टी पाँईटवंर नाकाबंदी करुन वाहणाची तपासणी सुरु केली असता ट्रक क्र. GJ-37-T-9921 यामध्ये प्रतिबंधीत पान पराग पान मसाला मोठे 35 बॉक्स ज्यामध्ये 90 ग्राम वजनाचे 21000 पॅकेट आढळून आले. या मालाची बाजार भावानुसार एकुण किमत 25,17,600/- रुपये असुन त्यासबंधी बिलाबाबत ट्रक मालकाची विचारपूस केली असता जवळ बिल तसेच मालकीसबंधी इतर कोणतेही कागदपत्रे नसल्याचे सांगितले.यावरुन ट्रक मुद्देमालासह पो.स्टे.ला जमा करुन ट्रकमधील प्रतिबंधीत पान परागबाबत भंडारा येथील अन्न सुरक्षा सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, भंडारा, यांना पत्राद्वारे कळविण्यात आले.त्यांनी संपुर्ण मालाची तपासणी करुन त्यांचा लेखी अहवाल व रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन देवरी येथे आरोपी हसन सलेमान रुखडा, वय 40 वर्ष, रा. खंबालिया, देवभूमी द्वारका, गुजरात यांचेविरुध्द अप.क्र. 89/2021 कलम 188, 272, 273,328 भा.द.वी. सहकलम अन्न सुरक्षा व मानदे कायदयाचे कलम 3(1) (झेडझेड)(iii), कलम 26(i), कलम 26(2)(i), कलम26(2)(iv), कलम 27(3)e), कलम30(2)(ए), कलम 59 या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे पुढील तपास पोनि. सिंगनजुडे सा. करीत आहेत.
नमुद गुन्ह्यामध्ये प्रतिबंधीत पान मसाला एकुण किमत 25,17,600/- रु. व ट्रक क्र. GJ-37/ T-9921 किमती 15,00,000/-रु असा एकुण 40,17,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,उपविभागीय पोलीस अधिकारी जालदंर नालकुल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.कारवाईत पोउपनि. उरकुडे, पोना. बोहरे, पोशि. कांदे, पोशि. भांडारकर यांनी सहकार्य केले.

blank