39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात 663 कोरोना पॉझिटिव्ह,20 मृत्यू,वाशिम ५४२ कोरोना बाधित

गोंदिया जिल्ह्यात 663 कोरोना पॉझिटिव्ह,20 मृत्यू,वाशिम ५४२ कोरोना बाधित

0
118

blank

गोंदिया,दि.14: गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज 663 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.तर 312 रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली.आज 20 रुग्णाचा मृत्यू झाला.शासकीय रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूचे प्रमाण हे सर्वाधिक दिसून येत आहे. तर आजपर्यंत 22802 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 16844 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 5693 आहे. 4393 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 265 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 74.67 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1 टक्के आहे तर डब्लिंग रेट 128 दिवस आहे.

वाशिम जिल्ह्यात आणखी ५४२ कोरोना बाधित

वाशिम शहरातील मंत्री पार्क येथील ३, कोविड रुग्णालय परिसरातील ९, नवजीवन क्रिटीकल केअर परिसरातील ५, पोलीस वसाहत येथील ४, लाखाळा येथील ९, टिळक चौक येथील १, सिव्हील लाईन्स येथील ९, ड्रीमलँड सिटी येथील २, प्रशासकीय इमारत परिसरातील १, विठ्ठलवाडी येथील १, अल्लाडा प्लॉट येथील ३, आययुडीपी कॉलनी येथील ६, सामान्य रुग्णालय परिसरातील १, दंडे चौक येथील १, दत्त नगर येथील १, निमजगा येथील १, गव्हाणकर नगर येथील १, राधाकृष्ण नगर येथील १, श्रावस्ती नगर येथील १, आंदनवाडी येथील २, शिवप्रताप चौक येथील १, इंगोले ले-आऊट येथील १, स्त्री रुग्णालय परिसरातील २, नंदिपेठ येथील २, पुसद नाका परिसरातील ३, सुंदरवाटिका येथील २, सिंधी कॉलनी येथील १, बाहेती हॉस्पिटल परिसरातील ५, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील ६, जैन भवन परिसरातील १, वाशिम क्रिटीकल केअर परिसरातील १, जवाहर कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ येथील १, ठाकरे हॉस्पिटल परिसरातील २, सौदागरपुरा परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ९, तोंडगाव येथील ८, टो येथील १, चिखली येथील ४, सापळी येथील १, जांभरुण परांडे येथील १, काटा येथील ७, ब्राह्मणवाडा येथील १, कळंबा महाली येथील १, शिरपुटी येथील १, देपूळ येथील २, सोनखास येथील १, सुरकुंडी येथील १, सावंगा जहांगीर येथील १, किनखेडा येथील २१, कार्ली येथील १, सुराळा येथील १, झाकलवाडी येथील १, सावळी येथील ४, चिखली सुर्वे येथील १२, पार्डी टकमोर येथील १, मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील २, वाईगौळ येथील १, रिसोड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १, अमरदास नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, अयोध्या नगर येथील २४, लोणी फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १८, वाकद येथील १, रिठद येथील ४, पळसखेड येथील १, गोवर्धना येथील २१०, मिर्झापूर येथील १, केनवड येथील ८, व्याड येथील १, मोठेगाव येथील १, जोगेश्वरी येथील १, कोयाळी बु. येथील ११, लोणी येथील २, जवळा येथील ६, भोकरखेडा येथील १, लिंगा येथील १, गणेशपूर येथील १, किनखेडा येथील ३, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, अशोक नगर येथील १, आदर्श नगर येथील ३, कोळी येथील १, धनज येथील १, मनभा येथील २, पोहा येथील १, काजळेश्वर येथील १, मालेगाव शहरातील जैन मंदिर परिसरातील १, वार्ड क्र. ८ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १०, रेगाव येथील १, मेडशी येथील ४, डही येथील १, मुंगळा येथील २, ब्राह्मणवाडा येथील २, किन्हीराजा येथील १, गिव्हा कुटे येथील १, वरदरी येथील १, पिंपळा येथील २, झोडगा येथील १, पांगरी नवघरे येथील १, डव्हा येथील १, शिरपूर येथील ४, मंगरूळपीर शहरातील अशोक नगर येथील १, बसस्थानक परिसरातील १, अकोला चौक येथील १, वाल्मिकी नगर येथील १, शिंदे कॉलनी येथील २, मंगलधाम येथील १, बायपास परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, नवीन सोनखास येथील १, कवठळ येथील १, चांभई येथील १, बोरवा येथील २, कंझरा येथील १, शेलूबाजार येथील १, नागी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून १६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

blank