42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता ‘त्या’ अनोळखी मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटली नाही

‘त्या’ अनोळखी मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटली नाही

0
53

blank

देवरी,दि.21- चिचगड पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या वासणी जंगल परिसरात एका अनोळखी इसमाने गेल्या २ एप्रिल रोजी  गळफास लावून आत्महत्या केली होती. त्या मृतदेहाची अद्यापही ओळख पटली नसल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

मृताच्या शरीरावर गडद हिरव्या रंगाच्या स्वेटर असून हातावर इंग्रजीमध्ये के लिहिलेला होता.  मृताचे वय 20 ते 22 वर्षे दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या इसमाचे प्रेत छत्तीसगड भागातील असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.  मृताची ओळख न पटल्याने  चिचगड पोलिसांनी त्याचा अंतिम संस्कार केला.
या घटनेची नोंद चिचगड पोलीस ठाणेत असून या प्रकरणाचा तपास ठाणेदार अतुल तवाडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक इस्कापे तपास करीत आहेत. कोणत्याही व्यक्तीला सदर मृताची ओळख पटल्यास चिचगड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन ठाणेदार तावाडे यांनी केले आहे.

blank