35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता पोलीस कोठडीत आरोपी मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षकसह पाच व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल

पोलीस कोठडीत आरोपी मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षकसह पाच व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल

0
239

blank

# चार आरोपींना अटक एक पसार
आमगाव,दि.२८::आमगाव येथील कुंभारटोली येथील अनेक गुन्हात अटक केलेल्या आरोपी राजकुमार अभयकुमार धोती वय 30 याला व साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या अटक केली होती,यातील राजकुमार अभयकुमार धोती सह सुरेश धनराज राऊत,राजकुमार
गोपीचंद मरकाम व एक अल्पवयीनआरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने २०मे रोजी  अटक केली होती, व २१मे  रोजी स्थानिक गुन्हे शाखेने आमगाव पोलीस ठाणेला सदर आरोपींना सोपविले .त्याच दिवशी आरोपीचा आमगाव ठाणे पोलीस कोठडीत (२२मे )ला सकाळी ५ :१५वाजता राजकुमार अभयकुमार धोती संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात तपासात पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक सह पाच जणांवर  खुनाचा गुन्हा दिनांक २७ मे रोजी रात्री दाखल करण्यात आले आहे .

सदर प्रकरणात आरोपी पोलीस निरीक्षक सुभाष चौहान , सहायक पोलिस निरीक्षक महावीर जाधव,पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके,दत्तातय कांबळे यांच्याविरोधात भादवी कलम ३०२,३३०,३४ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. यात पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव पसार असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
सदर तपास CID चे पोलीस अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर,पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी करीत असून आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात य़ेऊन कस्टडी घेण्यात आले आहे़

blank