39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
57

blank

अमरावती,दि.20ः- खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पूर्व राज्यमंत्री तसेच भाजपचे आमदार सुनील देशमुख यांनी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकारणात तांडव निर्माण झाले असुन एकीकडे भाजपामध्ये सन्नाटा तर दुसरीकडे कॉंग्रेसमधील एका गटात आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. मुळचे काँग्रेसवासी असलेले माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांची काही वर्षापूर्वी काँंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. याचाच परिणाम म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. आणि भाजपाच्या टिकीटावर निवडणूक लढवून विजय संपादीत केला. मात्र, मुळचे काँग्रेसचे असलेले सुनील देशमुख यांचे भाजपमध्ये कधीच मन लागले नाही. तसेच स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांची विचारसरणी जुळली नसल्यामुळे सुनील देशमुख हे फारकाळ भाजपमध्ये राहणार नाही याची दाळ शक्यता वर्तविल्या जात होती. याचाच परिणाम म्हणून डॉ सुनील देशमुख यांनी काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या दादर येथील टिळक भवनच्या नुतनीकरणानंतरचा उद््घाटन सोहळ्यामध्ये काँग्रेसमध्ये गृहप्रवेश केला. या कार्यक्रमाला एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश पांडे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, रजनी पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, खा. कुमार केतकर, खा. भालचंद्र मुणगेकर, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, चारुलता टोकस, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. अमिन पटेल, आ. झिशान सिद्दीकी, मा. खा. संजय निरुपम, मा. आ. बाबा सिद्दीकी, अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल, वामशी रेड्डी, बी.एम. संदीप, पृथ्वीराज साठे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, देवानंद पवार, राजन भोसले, राजाराम देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

blank