
सावली,दि.02ः- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपुर विभाग सावली तालुकाच्यावतीने ओबीसी आरक्षण पुर्ववत ठेवण्यासाटी तसेच 2021 च्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदारामार्फत मुख्यमंत्री व प्रधानमंत्र्यांना पाठवण्यात आले. शिष्टमंडळात तुळशीदासजी कुनघाडकर, तालुका अध्यक्ष गणपतराव कोठारे प. स. सदस्य,मनोहरराव कुकडे (सामाजिक कार्यकर्ते),सुखदेवराव बोदलकर (माजी सरपंच), अर्जुनभाऊ भोयर, (जिल्हा संघटक ओ. बी. सी) ,तुळशीदासजी भुरसे (विभागीय सचिव) युवा आघाडी प्रांतिक तैलिक महासभा व समाज बांधव उपस्थित होते.





