42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News नक्षलांची पुरून ठेवलेली रक्कम गडचिरोली पोलिसांना हस्तगत करण्यात यश

नक्षलांची पुरून ठेवलेली रक्कम गडचिरोली पोलिसांना हस्तगत करण्यात यश

0
43

blank

– १५ लाख रोख रक्कम सहित नक्षली स्फोटक पोलिसांनी केल जप्त

गडचिरोली,दि.०२ : जिल्ह्यात नक्षल कारवाई नेहमीच घडत असतात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पोलीस-नक्षल चकमक घडून येतात. मात्र नक्षलाकडे स्फोटक, बंदूक आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे कुठून येतात? यामागे आर्थिक व्यवहार कुठून होतो हा मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यात नुकताच तेंदू पत्ता हंगाम आटोपला आहे. यामध्ये तेंदू पत्ता कंत्राटदारांकडून मोठी खंडणी रक्कम घेऊन आणि इतर व्यावसायिकांकडून नक्षल अवैध रित्या खंडणी घेऊन नक्षलांना लागणारे साहित्य खरेदी करतात. आज गडचिरोली पोलिसांना असाच पुरून ठेवलेला नक्षलांचा पैसा सापडला असून यात नक्षली स्फोटक सहित इतर साहित्य सी-६० पोलीस जवानांना मिळाले आहे.

एटापल्ली ‘हालेवार’ हद्दीत कुदरी जंगल परिसरात सी- ६० पोलीस जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना १५ लाख ९६ हजार रोख रक्कम, इलेट्रीक बटन, स्विच, डेटोनेटर, वायर बंडल, वाकी टॉकी, नक्षल पॉम्पलेट, बॅनर, पिट्टू सहित इतर साहित्य या अभियान राबवित असतांना मिळाले आहे. गडचिरोली पोलीस दलाला नक्षलांचे हे साहित्य आणि पैसे सापडले असल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. सदर कारवाई गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.

blank