35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home रोजगार/व्यापार इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजना लाभ घेण्याचे आवाहन

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजना लाभ घेण्याचे आवाहन

0
36

blank

गोंदिया,दि.24 : राज्य शासनाद्वारे ओबीसी प्रवर्गातील बेरोजगार युवकांकरीता तसेच व्यवसाय करण्यास इच्छुक
असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय महामंडळामार्फत पुढीलप्रमाणे योजना राबविण्यात
येतात.
20 टक्के भांडवल योजना :- ही योजना राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या
माध्यमातून राबविण्यात येते. यामध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के. लाभार्थीचा सहभाग 5 टक्के व बँकेचा सहभाग
75 टक्के असतो. या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा 5 लक्ष रुपये आहे. व्याजाचा दर 6 टक्के असून परतफेडीचा
कालावधी 5 वर्ष आहे. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लक्ष रुपये
पर्यंत असावे.
1 लक्ष रुपयेपर्यंत थेट कर्ज योजना :- या योजनेमध्ये लाभार्थीचा सहभाग निरंक. अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे
असावे. अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 इतका असावा. अर्जदाराचे कौटूंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण
व शहरी भागाकरीता 1 लक्ष रुपये असावे. नियमीत 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल 2085 रुपये परतफेड
करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही, परंतू थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर
आकारण्यात येईल.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा 10 लक्ष रुपये पर्यंतची कर्ज योजना :- या योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 50
वर्षे असावे. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषि संलग्न व पारंपारिक
उपक्रम, लघु उद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन व्यापार व विक्री सेवा क्षेत्र इत्यादी व्यवसायाकरीता कर्ज व्याज
परतावा उपलब्ध करुन देणे. www.msobcfdc.org या वेबपोर्ट/महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी
करणे अनिवार्य आहे. असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी
कळविले आहे.

blank