42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News मिरवणुकीत कार घुसल्यानं ४ जणांचा मृत्यू

मिरवणुकीत कार घुसल्यानं ४ जणांचा मृत्यू

0
267

blank

जशपूर: छत्तीसगडच्या जशपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरून जात असलेल्या एका धार्मिक मिरवणुकीत कार घुसल्यानं ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत.कार अचानक मिरवणुकीत घुसल्यानं हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. उपस्थित लोक संतापल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला. उपस्थितांनी लोकांना चिरडणारी कार पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकासह दोघांना अटक केली.

बबलू विश्वकर्मा असं मुख्य आरोपीचं नाव आहे. त्याचं वय २१ वर्षे आहे. तो मध्य प्रदेशातल्या सिंगरौलीचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव शिलुपाल साहू असं आहे. त्याचं वय २६ वर्षे आहे. तो मध्य प्रदेशातल्या बबरगवा जिल्ह्याचा रहिवासी आहे. दोन्ही आरोपींविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

blank