
गोंदिया,दि.24ः- वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने २३ आँक्टोंबरला स्थानिक शासकीय विश्रामगृहात महिला आघाडीच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन अध्यक्षा कीरणताई फुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा.सतीश बन्सोड उपस्थित होते.बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील महीला आघाडी कार्यकारिणीची निर्मिती करुन जिल्हास्तरीय महिला मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले.महिलांचा सहभाग पुरुषांच्या समप्रमाणात संघटनेमध्ये निर्माण करण्याचा संकल्प केला गेला.येणाऱ्या जि.प. न.प. निवडणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतीनिधीत्व देण्याचे ठरविले आहे. सदर बैठकीला गोंदिया जिल्हा सहसचिव-विज्ञा बोरकर, जिल्हा कोषाध्यक्ष-विज्ञा वाढवे गोंदिया तालुका महासचिव-मनुजा श्यामकुवर , आमगाव तालुका अध्यक्ष-पुस्तकला शेंडे, महासचिव-कल्पना वासनिक,देवरी तालुका अध्यक्ष-सुनिता ईलमकर , महासचिव-मालन जाम्बुळकर,ललीता वाघमारे, गोरेगाव तालुका अध्यक्ष-माया जाम्बुळकर , मोरगाव अर्जुनी तालुका- अध्यक्ष प्रीया शेंडे, सचिव-सुकेशिनि नंदेश्वर, चेतना रामटेके,देवागंणा शहारे,फुलकन्या दिघोरे, सुनिता नंदेश्वर,मंगला बोम्बार्डे, अनमोल जनबंधु उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुस्तकला शेंडे यांनी केले. संचालन गोंदिया शहर महासचिव गुरजीत कौर कल्शी व आभार गोंदिया शहर अध्यक्ष सुरेखा मेश्राम यांनी मानले.जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांचे स्वागत शहर उपाध्यक्ष सुनिता भालाधरे यांनी केले.





