
अर्जुनी मोर.–तालुक्यातील झरपडा येथे ६५ व्या धम्मचक्र दिननिमित्य जनसंवाद कार्यक्रमात शिक्षण हाच खरा जीवनाचा महत्वाचा अंग असल्याचे प्रतिपादन सत्कारमुर्ती आमदार मनोहरराव चन्द्रिकापुरे यानी केले.या कार्यक्रमाला आदीवासी सामजिक कार्यकर्ते होमराज ठाकरे,सरपंचा कुंदा डोंगरवार,उपसरपंच विश्वनाथ खोब्रागडे,माजी उपसरपंच नामदेव परशुरमकर,तमुस अध्यक्ष भैयालाल मेश्राम,भैया रामटेके,निशा मस्के उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. महोदयाला वाजत गाजत गावतील सम्यक बुद्ध विहार येथे बुद्धमुर्तीचे पूजन करण्यात येऊन उपाली बुद्ध विहारात येऊन आ चंद्रीकापूरे यांच्या हस्ते त्रिमूर्ती,डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच बुद्ध मुर्तीचे दीपप्रज्वलन करुन माल्ल्यार्पण करण्यात आले.त्यानी गावतील नागरिकांना आपल्या मार्गदर्शनातून सांगीतले की,जीवनात जर यशस्वी व्ह्ययच असेल तर सर्वप्रथम शिक्षण पुर्ण करणे हे महत्वाचे आहे कारण शिक्षण हेच माणसाच्या जीवनातील महत्वाचे अंग आहे जो सुशिक्षीत तोच आजच्या या आधुनीक युगात भाग घेऊ शकतो म्हणून शिका,संघटीत व्हा ,संघर्ष करा हिच शिकवण बाबासाहेबांनी अपल्याला दिली.त्यांनी सांगीतले की बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जयजय कर करण्यापेक्षा त्यांच्या सुत्राचे पालन करा असे प्रतिपादन अर्जुनी मोर क्षेत्रातील आमदार मनोहरराव चन्द्रिकापूर यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थीत नागरिकांना केले व दिलेल्या प्रत्येक निवेदनाचे विचार करुन पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुन्ना बोरकर यानी केले तर संचालन व आभार अविनाश मेश्राम यानी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू मेश्राम,सुरज मोटघरे,राष्ट्रपाल रामतेके तसेच तथागत सत्तद्धम्म संस्था व करूणा महासंघ येथील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.





