35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर पिंपळगाव येथे ग्रामसफाई

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर पिंपळगाव येथे ग्रामसफाई

0
23

blank

अर्जुनी मोरगाव-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर तालुक्यातील पिंपळगाव येथे प्रहार जनशक्तीच्या वतीने ग्रामसफाई करून गाव स्वच्छ केला.पिंपळगाव येथील प्रवेशद्वारावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या प्रतिमा आहेत.या प्रतिमां सभोवताल केरकचरा वाढला झाला होता. ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार निदर्शनास आणून दिली.मात्र ग्रामपंचायतने या विषयाकडे कानाडोळा केला.शेवटी राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी पर्वावर प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीमेतुन ग्रामसफाई केली. यावेळी तालुका उपाध्यक्ष खोजराज मेंढे,पिंपळगावचे अध्यक्ष अजय ब्राह्मणकर, उपाध्यक्ष गुणरत्न खोबरागडे, सचिव प्रशांत ऊके, सुदर्शन शेंडे,राहूल गजबे,दुर्गेश कुंभरे, श्रीराम कोरे,सुरज कांबळे, महेश मटाले,प्रेमचंद्र रहिले, मनोज कावळे आणि प्रहार जनशक्ती चे कार्यकर्ते उपस्थित होते.ग्रामसफाई अभियानाचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

blank