
गोंदिया,दि.06 : तालुक्यातील ग्राम नवरगाव (कला) येथील कामठा मार्गावरील कोल्हापुरी बंधारा मागील ६ वर्षांपासून बनलेला असुन कोल्हापुरी बंधारा फक्त हा फक्त शोभे करिता बनलेला आहे. ६ वर्षा पासुन या बंधाऱ्यावरील दरवाजे बरोबर न बसविल्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्याचा कसलाच उपयोग शेतकऱ्यांना होत नाही.या बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने या कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जेव्हापासून हा बंधारा तयार करण्यात आला तेव्हापासून याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही. बंधाऱ्यात पाणी साचून राहत नसल्याने हा बंधारा शेतकऱ्यांसाठी केवळ नाममात्र ठरत आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्याला मोठी खिंड पडली आहे. मात्र लघु पाटबंधारे विभागाने अद्यापही त्याची दुरूस्ती केली नाही.परिणामी नवरगाव (कला), कामठा,मुंडीपार, या गावातील शेतकऱ्यांना सिंचनपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी कोल्हापुरी बंधारा तयार केला.यासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र आता संबंधित विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे शेतकऱ्यांना ६ वर्षापासून सिंचनासाठी वंचित रहावे लागत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोल्हापुरी बंधारा च्या वरील भागात नवरगाव (कला), कामठा, मुंडीपार ह्या गावाची नळ पाणी पुरवठा योजनेची विहीर असल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची सोय तसेच भूजल पातळी वाढविण्यास मदत झाली असती. मात्र यात पाणीच साचून राहत नसल्याने याचा कसलाच उपयोग होत नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्याची मागणी भाऊलाल तरोणे, राजकुमार महारवाडे, भोजराज बावनकर, सोमाजी हत्तीमारे, किशोर खोटेले,रामेश्वर फुंडे,उमेद हरिणखेडे, सुरेश गजभिये, वासुदेव वाढई, नरेंद्र गजबे, बिसराम चौधरी,राजु फरकुंडे, कुवरलाल बहेकार,दिलीप तुपट,रवीजी हेमने,यादोराव चुटे, अशोक भांडारकर, विश्वास ठाकूर व अन्य शेतकरी..





