39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता लाचप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रंगेहात पकडला

लाचप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रंगेहात पकडला

0
91

blank

यवतमाळ-लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी केलेल्या कारवाईत यवतमाळ येथील लोहारा पोलिस ठाण्याच्या एका सहायक पोलिस निरीक्षकास सात लाखांच्या लाच प्रकरणात रंगेहात ताब्यात घेण्यात आले. तसेच या लाच प्रकरणात त्याला सहकार्य करणार्‍या इतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवार, 7 डिसेंबर रोजी करण्यात आली.
अनिल घुगे (वय 52) असे त्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव असून विद्युत वसानी व विशाल माकडे अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराविरोधात लोहारा पोलिस ठाण्यात एका प्रकरणात गुहा दाखल करण्यात आला आहे. येथे कार्यरत अनिल घुगे याने तक्रारदारास जमानत होईल अशी मदत करण्यासाठी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती अनिल घुगे याने 7 लाख रुपये घेण्याचे मान्य केले. तसेच मंगळवार, 7 डिसेंबर रोजी स्टेट बँक चौकातील डॉलर शॉपीमध्ये लाच घेण्याचे ठरवण्यात आले. ही लाचेची रक्कम घुगे याने विशाल माकडे याच्यामार्फत स्वीकारली, तर विद्युत वसानी याने त्याला लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिली. त्यालाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरोधात यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर अधीक्षक अरुण सावंत, उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक किशोर म्हसवडे, निरीक्षक अमोल कडू, विनोद कुंजाम, सुनील जायभाये, शैलेश कडू यांनी यशस्वी केली.

blank