37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ निवडणूकीसाठी शाळा, कॉलेज व आंगणवाडी यांना 20 व 21 डिसेंबरला सुट्ठटी

निवडणूकीसाठी शाळा, कॉलेज व आंगणवाडी यांना 20 व 21 डिसेंबरला सुट्ठटी

0
119

blank

गोंदिया,दि.17 : राज्य निवडणूक आयोगाचे 26 नोव्हेंबर 2021 चे
पत्रानुसार घोषित करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गोंदिया
जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका 21
डिसेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहेत. त्यानुसार या निवडणुकांची मतदान
प्रक्रियेकरीता निश्चित केलेल्या मतदान केंद्राचे ठिकाणी सर्व मतदान
साहित्यासह मतदान पथके 20 डिसेंबर 2021 रोजी पोहचतील व 21 डिसेंबर 2021
रोजी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी 5.30 नंतर रात्री उशिरापर्यंत
मतदान पथके सर्व साहित्यानिशी परत येणार आहे. मतदान केंद्राचे ठिकाण
शासकीय/निमशासकीय/खाजगी शाळा व कॉलेज तसेच आंगणवाडी येथील इमारतीमध्ये
आहेत.

राज्य निवडणूक आयोगाचे 10 डिसेंबर 2021 चे पत्रामध्ये दिलेल्या
निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय/खाजगी शाळा व कॉलेज
तसेच आंगणवाडी यांना 20 व 21 डिसेंबर 2021 या दोन दिवशी भरपगारी सुट्टी
जाहीर करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी प्रसिध्दी
पत्रकाद्वारे कळविले आहे.

blank