
गोंदिया :- संवैधानिक एकता, शांतता, बंधुता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी गोंदिया डेली सायकलिंग ग्रुपचे सायकलपटू अशोक मेश्राम यांनी गोंदिया ते नागपूर (दीक्षाभूमी), पुणे (भीमा कोरेगाव), मुंबई (चैत्यभूमी) पर्यन्त परतीचा 2500 किमी इतका सायकल प्रवास शनिवार, दि. 25 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7:00 वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा चौक, प्रशासकीय इमारत, गोंदिया येथून प्रारंभ होत आहे.
संवैधानिक एकता, शांतता, बंधुता आणि निरोगी भारत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी सायकलपटू अशोक मेश्राम हे गोंदिया डेली सायकलिंग ग्रुप आणि संविधान मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया येथून नागपुर-पुणे-मुंबई सायकलिंग प्रवासावर जात आहेत. या 2500 किलोमीटरच्या सायकल प्रवासासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संविधान मैत्री संघ आणि गोंदिया डेली सायकलिंग ग्रुपच्या वतीने जिल्ह्यातील रहिवाशांना तन-मनाने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





