
मुंबई,दि.3-नारकोटिक्स ड्रग्स कंट्रोलचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुदत वाढ न देता अखेर त्यांची बदली महसूल गुप्तचर संचलनालय येथे करण्यात आल्याचे वृत्त आहे.
श्री वानखेडे यांची बदली डीआर आय मध्ये दाखविण्यात आली असली तरी अद्यापही त्यांनी पदभार सोडला नसून ते गोवा येथे एका गुन्ह्याच्या तपास कार्यासाठी गेले आहेत. उल्लेखनीय म्हणडे नबाब मलीक यांनी वानखेडे यांना मुदतवाढ मिळावी म्हणून भाजपचा एक बडा नेता प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता.
समीर वानखडे यांनी सप्टेंबर 2019 मध्ये NCB चा पदभार स्विकारला होता. ते अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्ज तस्करी प्रकरणात केलेल्या कारवाईनंतर चर्चेत आले होते. समीर वानखडे यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्येच संपला होता. मात्र त्यांना चार महिने मुदतवाढ मिळाली होती.
कार्डेलिया क्रूझ प्रकरणातील पंचाच्या आरोपानंतर वानखडे यांच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले.





