39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

0
44

blank

गोरेगांव,दि.30:-राष्ट्रपिता महात्मा गांधी(बापु)यांची 74 वी पुण्यतिथी आज रविवारला ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे सरपंच सुमेंद्र धमगाये यांच्या अध्यक्षेत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन  साजरी करण्यात आले.यावेळी उपसरपंच जावेद (राजाभाई) खान,सचिव अरविंद साखरे,तं.मु.अध्यक्ष गिरीश पारधी,माजी तं.मु.अध्यक्ष नामदेव नेवारे,सर्व ग्राम पंचायत सदस्य, ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर,परिनकसंघ चालक रोहित पांडे,ग्रा.पं.लिपीक सुनिल वाघाडे,ग्रा.पं.परिचर अजय नेवारे, ज्ञानेश्वर राऊत, राजेंद्र बिसेन,संतोष चौधरी,भोला बिसेन,दिपचंद बिसेन,देवराज नेवारे,योगेश गमधरे आदी उपस्थित होते.
भारतामध्ये असे काही व्यक्तिमत्व घडून गेले ज्यांनी जगावर आपल्या विचारांच गारूड घातलं. आजही त्यांनी आखून दिलेला मार्ग हा जगभर स्वीकारला जात आहे. असे प्रतिपादन ग्राम मुंडीपारचे सरपंच सुमेंद्र धमगाये यांनी केले.

महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आडकुटोला येथे आँनलाईन विविध उपक्रमांचे शुभारंभblank

महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आडकुटोला केंद्र बबई पंचायत समिती गोरेगाव येथे आज ३०/१/२०२२ रविवार ला विविध उपक्रमांचे (आँनलाईन) शुभारंभ शासनपरिपत्रकाच्या नियोजनानुसार करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जीवनावर सविस्तर माहिती देऊन तैलचित्र पुजन करण्यात आले.मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक बि.डी.पटले, सामाजिक कार्यकर्ते पुरणलाल बिसेन व गोपालभाऊ अंबुले उपस्थित होते.आनलाईन उपक्रमात १५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत ‌.संचलन व आभार हरिराम येळणे गुरूजी यांनी केले.

blank