
नागपूर-,बिबट्याच्या leopard कातडीची तस्करी मिहान परिसरात होत असल्याची माहिती डब्ल्यूसी सीबी-वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांनी वनविभागाला दिली. त्यानुसार नागपूर वनविभाग व डब्ल्यूसी यू सीबीची संपूर्ण चमू मागील आठ दिवसांपासूनसू आरोपींवर लक्ष ठेवून होती.दरम्यान, ६ मार्च रविवारी सकाळी सापळा रचून जय उमिया, कापसी खुर्द येथून बिबट्याच्या कातडीसह ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.सदर प्रकरणात मागील आठ दिवसांपासून वनकर्मचारी सक्रिय होते. त्यानुसार बनावट ग्राहक तयार करून आरोपींसोबत बोलणी करण्यात आली. यादरम्यान खरेदी- विक्रीचा व्यवहार निश्चित झाला, परंतु आरोपींनी विविध ठिकाणे बदलली. आरोपी हातून निसटून जाईल या भीतीने
वनविभागाने कापसी खुर्द परिसरात सापळा रचून आरोपी संजीव बेहेरा, नरेश दरोडे यांना बिबटाच्या कातडीसह रंगेहात ताब्यात घेतले.दोघांची चौकशी केली असता, तिसऱ्या आरोपीस प्रवीण लांजेवार याला वनविभागाने ताब्यात घेतले.
आरोपींकडून चार फुट लांब आणि १.५ फुट रुंदीची एक नग कातडी जप्त करण्यात आली. सदर प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार विविध कलमांद्वारे वनगुन्हा नोंदविण्यात आला. हे सर्व आरोपी नागपूरचेच आहे हे विशेष . सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक युवराज, उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहा. वनसंरक्षक एन. जी. चांदेवार, डब्ल्यूसी यू सीबीचे पथक एल. व्ही. ठोकळ, एस. बी. केकान, निलेश तवले, सचिन राघोर्ते आदी कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहा.वनसंरक्षक एन. जी. चांदेवार करीत आहेत.





