39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ मुंडिकोटा येथे जन आरोग्य समितीची सभा

मुंडिकोटा येथे जन आरोग्य समितीची सभा

0
22

blank

तिरोडा : तालुक्यातील ग्राम मुंडिकोटा येथील आरोग्य केंद्रामध्ये जन आरोग्य समितीची सभा घेण्यात आली. यात जनतेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

अध्यक्षस्थानी जिप सदस्य रजनी कुंभरे होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने जिप सदस्य किरण पारधी, पंस सभापती कुंता पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शीतल घोरमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पलाश शहारे, पं.स. सदस्य प्रमिला भलावी, पं.स. सदस्य वनिता भांडारकर, पं.स. सदस्य जितेंद्र चौधरी, अंगणवाडी सुपरवायजर पुष्पा भांडारकर, सरपंच कमलेश आथीलकर, पांजराचे सरपंच राजेंद्र चामट व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.या वेळी जिप सदस्य किरण पारधी यांनी डॉक्टरांना सांगितले की, पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे नागरिकांना डायरिया, मलेरिया यासारखे आजार होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या. त्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट करा. आपणास कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास मी तुम्हाला नक्की मदत करेन, असे सांगून जिप सदस्य किरण पारधी यांनी आश्वस्त केले.

blank