39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी

पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी

0
21

blank

मुंबई, दि. १२ – भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने पाचवर्षांसाठी बंदी घातली आहे.
या शिक्षेमुळे रौफ यांना बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत पंच म्हणून काम करता येणार नाही. आयपीएल २०१३ मधील सट्टेबाजी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात रौफ यांचा वॉंटेड आरोपी म्हणून समावेश केला आहे.
मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत हा बंदीच्या शिक्षेचा निर्णय घेण्यात आला.

blank