35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ जिल्हास्तरीय वक्‍तृत्व स्पर्धेत मयुरी गौतम द्वितीय

जिल्हास्तरीय वक्‍तृत्व स्पर्धेत मयुरी गौतम द्वितीय

0
20

blank

अर्जुनी-मोरगाव : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष देशभर साजरा होत असताना ठिकठिकाणी अनेकविध उपक्रम घेण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय येथील बीएससी फायनलची विद्यार्थिनी मयुरी गौतम हिने वयोगट 19 ते 22 मध्ये सहभाग घेतला. तसेच ‘भारतीय संविधान’ या विषयावर आपले व्हिडिओ क्लिप स्पर्धेकरिता पाठविले. यात तिला द्वितीय क्रमांक मिळाला.

महाविद्यालयात दिनांक 15 ऑगस्टला महाविद्यालयातील प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले यांनी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर संस्था अध्यक्ष लूणकरण चितलांगे, संस्था सचिव मुकेश जायस्वाल, संस्था कोषाध्यक्ष नंदकिशोर राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे उपस्थितीत मयुरी गौतमचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. तसेच तिच्यापासून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित होऊन अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेत स्वतःचे नाव तसेच महाविद्यालयाचा नाव लौकिक यात निरंतर वाढ करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेतील सर्व पदाधिकार्‍यांनी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी तिचे अभिनंदन केले.

गोंदिया पोलीस दल व पोलीस उपविभागीय अधिकारी देवरी यांच्यावतीने स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मयुरी गौतम ला अर्जुनी मोरगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये अर्जुनी-मोरगाव येथील एसडीएम डॉ.विजयकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते, तहसीलदार विनोद मेश्राम आणि पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्या प्रमुख उपस्थित स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

नगरपंचायतकडूनही मयूरीचा सत्कार

अर्जुनी मोरगाव येथील नगरपंचायतच्या वतीने मयुरी गौतमचे सत्कार नगराध्यक्ष बारसागडे यांच्या हस्ते शांतीचे प्रतीक म्हणून रोपटे आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आले. याप्रसंगी नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

blank