35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिव्यांग नागरिक कृत्रिम अवयव उपकरण वाटप

पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिव्यांग नागरिक कृत्रिम अवयव उपकरण वाटप

0
25

blank

गडचिरोली,दि.21- शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा गरजू आदिवासींना लाभ मिळवून देण्यासाठी गडचिरोली पोलिस सदैव प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पोलिस अधिक्षकांच्या मार्गदार्शनाखाली पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून नुकताच २६0 दिव्यांग नागरिकांना कृत्रिम अवयम उपकरणाचे वाटप करुन दिव्यांगाना आधार देण्यात आला.
गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने तसेच अलिम्को कंपनी मुंबई, जनरल इन्शुरंस कंपनी मुंबई, समाजकल्याण विभाग व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज, २0 सप्टेंबर रोजी पोलिस मुख्यालयातील पांडू आलाम सभागृहात दिव्यांगाना कृत्रिम अवयव उपकरण वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 260 दिव्यांगानाता पोलिस दलाच्या वतीने व्हिलचेअर, तीनचाकी सायकल, स्वयंचलित मोटार सायकल आदी कृत्रिमि अवयव उपकरणाचे मोफत वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील 400 दिव्यांग नागरीकांसह 70 युवक-युवती ब्युटीपार्लर, फोटोग्रॉफी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
सदर मेळाव्याला पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अहेरी अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे, सीएसआर कन्सलंट कमलेशादव, अल्मिको मुंबईचे डॉ. कृष्णा मोर्या, डॉ. निहांश अल्मिको, संगिता तुमडे, विकलांग समन्वयक आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे, पोमकेचे सर्व अधिकारी, पोलिस अंमलदार, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी, सहाय्ये पोलिस निरीक्षक महादेश शेलार, पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.

दिव्यांगासाठी आयोजित शिबिराच्या माध्यमातून हजारो दिव्यांगाना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये 1349 दिव्यांगाना दिव्यांग प्रमाणपत्र, 670 दिव्यांगाना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, 850 दिव्यांगाना संजय गांधी निराधार योजना, 410 साहित्य वाटप, 411 दिव्यांगाना कृत्रिम हात, पाय आदी साहित्य वाटप करण्यात आले. दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नरत : पोलिस अधीक्षक सदर मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले की, पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. सदर दिव्यांगाच्या समस्या दूर करण्यासाठी पोलिस प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे.

 

blank