
गोंदिया : मुलांमध्ये जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण आणि रक्तक्षय होऊन त्यांना सतत थकवा जाणवतो तसेच त्यांची शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णता होत नाही त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिनांक 10 ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील एक ते 19 वर्ष वयोगटातील मुला मुलींना जंतनाशक गोळी निशुल्क खाऊ घातली जाणार आहे.
6 ते 19 वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना संस्था स्तरावर शिक्षकांमार्फत प्रत्येक शाळेत जेवणानंतर गोळी खाऊ घातली जाणार आहे.तर एक ते 19 वर्षे वयोगटातील अंगणवाडी व शाळेत न जाणाऱ्या मुला मुलींना अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका मार्फत गोळी खाऊ घातली जाणार आहे.
ज्या मुला मुलींना दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी जंतनाशक गोळी खाऊ घातली जाणार नाही त्यांना दिनांक 17 ऑक्टोबर रोजी माप ऑप दिनी गोळी दिली जाईल.मोहिमेबाबतचे सर्व नियोजन जिल्हा आरोग्य प्रशासना मार्फत पुर्ण झाले आहे. गावोगावी मोहिमे विषयी जनजाग्रुती वर भर देण्यात येत आहे. गावात , शाळेत प्रभातफेरी , बँनर व दवंडी च्या माध्यमातुन लोकांना माहिती देण्यात येत आहे. दिनांक 08 ऑक्टोबर रोजी गोंदिया शहरात मध्यवर्ती रस्त्यावर प्रभातफेरी व चित्ररथाच्या माध्यमातुन मोहीमेच्या अनुषगांने जनजाग्रुती करण्यात आली. प्रभातफेरी जिल्हा सामान्य रुग्णालय के.टि.एस.येथुन सुरुवात झाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरिश मोहबे व गोंदिया जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांनी हिरवी झेंडा देवुन सुरुवात केली. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय येथील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी , के.टि.एस. जिल्हा सामान्य रुग्णालय, राष्ट्रिय आरोग्य अभियान,आरोग्य विभागातील विविध विभागाचे समन्वयक यांच्या एकत्रित सहकार्याने प्रभात फेरी यशस्वी झाली.
प्रभात फेरी व चित्ररथ दरम्यान जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात , जिल्हा साथरोग तज्ञ डॉ.सुशांकि कापसे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे , जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिना वट्टी, जिल्हा दंत व मुखरोग तज्ञ डॉ. अनिल आटे , जिल्हा एन.सी.डी. समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी ,आरोग्य सहाय्यक रविंद्र श्रीवास उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व गावात समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ), आरोग्य सेविका ,आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे मार्फेत ग्रुहभेटी व शालेय प्रभात फेरीतुन जनजाग्रुती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात बँनर व होर्डिंगच्या माध्यमातुन प्रसिद्धि वाढविण्यात आली आहे.





