39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home रोजगार/व्यापार ध्येय निश्चिती शिवाय यश अशक्य- उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे

ध्येय निश्चिती शिवाय यश अशक्य- उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे

0
37

blank

गोंदिया,दि.03ः पोलीस विभाग गोंदिया व अदानी फाउंडेशन तिरोडाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमातील बारा प्रशिक्षणार्थींची सैन्य,नेव्ही,एमएसएफ,बीएसएफ,सीआयएसएफ,रेल्वे पोलीस सारख्या विविध विभागांमध्ये निवड झाली आहे. त्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार समारोह अदानी पावर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडा येथे नुकताच पार पडला.यावेळी प्रामुख्याने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे,तिरोडा येथील अदानी पाँवर प्लांट प्रमुख कांती बीश्वास, ऑपरेशन अँड मेंटेनन्स हेड संजय रांगणेकर, सुरक्षा विभाग प्रमुख राजेंद्र मुरइ व अदानी फाउंडेशन प्रमुख बिमुल पटेल उपस्थित होते.
यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी युवकांनी ध्येय निश्चिती करून ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केल्यास यश नक्की मिळते असे विचार व्यक्त केले.तसेच जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर प्रशिक्षणार्थींनी सुद्धा यश संपादन करावे.अदानी फाउंडेशनच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच ऑपरेशन अँड मेन्टेनन्स हेड संजय रांगणेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सुरक्षा विभाग प्रमुख राजेंद्र मुरइ यांनी यश प्राप्तीसाठी शिस्तबद्ध प्रयत्न तसेच ज्या परीक्षेचे आपण तयारी करत आहोत त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे असे सांगितले.
प्रास्ताविकातून बीमुल पटेल यांनी आजच्या सत्कार समारंभाचे आयोजन यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी यासाठी करण्यात आले आहे असे सांगितले. याप्रसंगी जयश्री भगत, संतोष पटले, संदीप टेंभरे, दिव्या बिंजाडे, उद्देश गौतम, निलेश लिल्लारे, जितेंद्र भगत, कृष्णकुमार गमे, विशाल ठाकरे, महेंद्र मुटकुरे, संतोष टेंभरे, अंकुश टेंभरे, आशिष पारधी, गौरव रिद्धनर्थी, नेहा पारधी या यशस्वी युवक युवतींचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शेजव व आभार प्रदर्शन स्वप्निल वाहने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक सचिन बिसेन व जतिन येळे यांनी तसेच अदानी फाउंडेशनच्या सर्व टीमने परिश्रम घेतले.

blank