
गोंदिया– जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. आव्हाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थागुशा येथील पथकाद्वारे अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. यातंर्गत ३ डिसेंबर रोजी पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकून ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पहिल्या कारवाईत पोलिसांनी सालेकसा येथे सापळा रचून चारचाकी वाहनात ठेवलेली ३३ हजार ५00 रुपयांची अवैधरित्या देशी दारु पकडली. याप्रकरणी अवैध दारु व वाहन असा एकूण २ लाख ५८ हजार ६00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सालेकसा पोलिसांनी वाहन चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या कारवाईत गोंदिया तालुक्यातील आसोली येथे पोलिसांनी धाड टाकून संघर्ष सुदेश गडपायले याकडून ६ हजार रुपयांची हातभट्टीची दारु व दुचाकी असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन कारवाईत पोलिसांनी ३,६४,६00 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थागुशाचे पोनि बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, गोपाल कापगते, पोहवा भुवन देशमुख, राजेंद्र मिर्शा, पोशि संतोष केदार, विजय मानकर, अजय रहांगडाले, चापोशि मुरली पांडे यांनी केली.





