39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ वैयक्तिक शेततळे योजना लाभार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करावे

वैयक्तिक शेततळे योजना लाभार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करावे

0
21

 गोंदिया दि. 14: कृषी विभागातर्फे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयासाठी कमाल रक्कम रुपये 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. वैयक्तिक शेततळे या योजनेचा लाभ घेण्याकरिता जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अर्ज प्रक्रिया:- महाडिबीटी पोर्टलचे https://mahadbtmahit.gov.in  हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातुन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. त्यानुषंगाने ऑनलाईन सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड करुन पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे.

लाभार्थी पात्रता:-

* अर्जदार  शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र

    धारणेस कमाल मर्यादा नाही.

* अर्जदार  शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील.

   जेणेकरुन वाहून जाणारे पावसाचे पाणी नैसर्गिक प्रवाहाद्वारे शेततळयात साठविणे करीता पुर्नभरण

   करणे शक्य होईल.

* अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामुहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी

    किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतुन शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ

    घेतलेला नसावा.

नोंदणी प्रक्रिया:- अर्जदारांनी प्रथमतः वापरकर्त्याचे नाव (युझर आयडी) व संकेत शब्द (पासवर्ड) तयार करुन घ्यावा व आपले खाते उघडावे त्यानंतर पुन्हा लॉगिन करावे. अर्जदारांना वैयक्तिक शेततळे या घटकासाठी वैयक्तिक लाभार्थी म्हणुन नोंदणी करावयाचा पर्याय उपलब्ध असेल. अर्जदारांना त्यांच्या इच्छेनुसार पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होणेकरिता महाडिबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

blank