35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News वनहक्क समितीच्या अधिकारासाठी आमदार कोरोटे आणि प्रशासन समोरासमोर

वनहक्क समितीच्या अधिकारासाठी आमदार कोरोटे आणि प्रशासन समोरासमोर

0
28

blank

  1. ■ आंदोलनस्थळी राजकिय नेते, पटोले, फुके, बन्सोड यांची हजेरी 
    देवरी, ता. ०७: म्हैसुली, पळसगाव, कोटजांभोरा, परसोडी, केशोरी, मोहांडी, पिपरखारी, पाऊलझोला, गणुटोला,कडीकसा, धमदीटोला, बुजुरबडगा, येडमागोंदी, उचेपूर आदी आदिवासी बहुल गावांतील सामुहिक वन हक्क समितीचे पदाधिकारी व सदस्यांकडून वनविभाग कार्यालय दक्षिण देवरी समोर गेल्या ३० मे पासून सामूहिक वनवासी व इतर पारंपरिक वनवासी यांच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषणावर बसले होते. या उपोषणात सोमवार, (ता.५ जून ) रोजी या भागाचे आमदार सहषराम कोरोटे हे देखील सामील झाले.
    आमदार उपोषणाला बसल्याचे वृत्त समजताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके व माजी आमदार संजय पुराम यांनी ६ जून रोजी आंदोलनस्थळी भेट देऊन वन हक्क समितीच्या मागण्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर हे आंदोलन झपाट्याने चर्चेत आले. कालबाह्य मक्तेदारी कायद्यांतर्गत वनविभागाने नोंदवलेले गुन्हे तात्काळ रद्द करावेत आणि तेंदूपत्ता संकलनासाठी सामूहिक वनहक्क समितीला दिलेले टार्गेट रद्द करावे, या मागणीला धरून आमदार सहसराम कोरोटे हे आदिवासींसोबत रात्रभर वनविभाग कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसले. दुसरीकडे कार्यालयाच्या बाहेरील पेंडालमध्ये १६ उपोषणकर्ते आमरण उपोषणाला बसले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड हेही सकाळी आंदोलनस्थळी पोहोचले. त्याचवेळी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके हेही उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. त्यांनीही उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत येथून जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांना फोन करून देवरी येथे येण्यास सांगितले. जिल्हाधिकारीही दुपारी देवरीला पोहोचले. या दरम्यान, आमदार कोरोटे यांनाही तेथे चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या जातील, असे तोंडी आश्वासन दिल्यानंतर आठवडाभरापासून सुरू असलेले उपोषण संपले. उपोषणकर्त्यांशी झालेल्या चर्चेत आमदार सहषराम कोरोटे, एस.पी. निखिल पिंगळे, डी.एफ.ओ. कुलराजसिंह, देवरीचे उपविभागीय अधिकारी अनमोल सागर, कांग्रेसचे देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, आमगाव तालुकाध्यक्ष संजय बहेकर,देवविलास भोगारे,मधू दिहारी आदी उपस्थित होते.

*उपोषणाचे ठिकाण बनले राजकारणाचा तालीमखाना.*
=============≠========
, लोकसभा-विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी प्रत्येक संधीचे राजकारण करून श्रेय लाटण्याची राजकारण्यांनमध्ये स्पर्धा सुरू आहे. असेच एक उदाहरण मंगळवारी समोर आले. गेल्या ८ दिवसांपासून वनहक्क ग्रामसभेतील लोक आपल्या मागण्यांसाठी वनविभाग कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. मात्र त्यांची दखल घेण्यास ना प्रशासनाचा अधिकारी आला ना कोणी नेता. मात्र ५ जून रोजी आमदार सहषराम कोरोटे हे धरण्यावर बसताच माजी आमदार संजय पुराम हे उपोषणाला बसले व माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनाही येथे बोलविण्यात आले.अखेर चर्चे अंती उपोषणकर्त्यांचे उपोषण संपविण्यात आले.

blank