
गोंदिया-राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध कार्यालयात तपासणी शिबीरे आयोजित करुन कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहीती जिल्हा समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी यांनी दिली आहे.
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय गोंदिया येथे कुवर तिलक सिंग जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदियाच्या वतीने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम दि.22 जुलै रोजी एक दिवशीय विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सदर आरोग्य शिबिरात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, विविध मागासवर्गीय महामंडळे येथील अधिकारी व कर्मचारी तसेच क्रिस्टल व बीव्हीजी कंपनीच्या बाह्य स्त्रोत कर्मचारी असे एकूण 60 कर्मचाऱ्यांची उच्च रक्तदाब व मधुमेह यासारख्या जीवनशैली संबंधी आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.सदर प्रसंगी आरोग्यदायी जीवन शैली,संतुलित आहार व योग्य व्यायाम,बीपी,शुगर ची नियमित तपासणी करण्याचे महत्त्व भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर व वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनम जाधव यांनी समजावुन सांगितले. तसेच तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि त्यापासून होणारे आजार याविषयी मार्गदर्शन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या सामाजिक कार्यकर्त्या संध्या शंभरकर यांनी दिले.
सदर आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर,कार्यालय अधीक्षक स्वाती कापसे, प्रभारी सहाय्यक लेखा अधिकारी राजेश मुधोळकर, हेमंत घाटघूमर,लक्ष्मण खेडकर,निवेदिता बघेले,आशिष जांभुळकर,गिरधर गोबाडे,निशांत वाघमारे,मनीषा टेंभुर्णे,पुष्पलता हांडे यांचे सह क्रिस्टल व बीव्हीजी बाह्य स्त्रोत कर्मचारी केटीएस रुग्णालयाच्या डॉ.सोनम जाधव,प्रणोती शहारे,मनोज राठोड यांचे सहकार्यातुन संपन्न झाले.





