39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा पाॅवर लिप्टींगमध्ये संतोष बंधाडेंना गोल्ड मेडल

पाॅवर लिप्टींगमध्ये संतोष बंधाडेंना गोल्ड मेडल

0
44

blank

तिरोडा,दि.२४ः-महाराष्ट्र राज्य पॉवर लिप्टींग स्पर्धा व सिंगल ईवेंट ब्रेच प्रेस व डेडलिप्ट स्पर्धा 2025 (Raw)आमदार निवास नागपूर येथे आयोजीत करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये 100 ते 105 किलो वजन गटामध्ये तुमसर येथील सेंटर पॉईन्ट हेल्थ क्लबचे खेळाडु संतोष ब्रम्हानंद बंधाटे यांनी प्रथम स्थान पटकाविले.

त्यांनी सदर श्रेणीमध्ये Squat 140 Kg. बेंच प्रेस मध्ये 120 किलो व डेडलिष्ट स्पर्धे मध्ये 170 किलो वजन उचलुन प्रथम स्थान पटकाविले. त्यांनी एकुण पुर्ण स्पर्धेमध्ये एकुण 430 किलो वजन उचलले.संतोषनी सदर स्पेर्धेमध्ये प्रथम स्थान पटकावुन तुमसर शहराचे नाव गौरविले. संतोष बंधाटे हे अदानी पॉवर, तिरोडा येथे STF या पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या यशाबद्दल अदानी पॉवर सेक्युरिटी हेड सुर्यकांत कश्यप, हरीष ख्यानी, अॅड. प्रमोद इलमे संचालक Center Point Healt club तुमसर डॉ. प्रकाश सिंग, बॉडी बिल्डींग अध्यक्ष भंडारा, अरविंद थोटे, सतिश बंधाटे, कमलेश दमाहे, संतोष बोहने, विजय गणेशे, जयंत गणेशे, योगेश भाऊ सिंगनजुडे, सत्यम नंदागौली, साजिद सय्यद, अतुल रोडगे, शैलेश रोडगे, संचित मेश्राम, घनश्याम गुप्ता, समिर वंजारी MSF सेक्युरीटि ऐशो नरेंद्र सुरसाऊत इत्यांदीनी अभिनंदन केले.ऑक्टोंबर – 2025 बेंगलोर च्या नॅशनल स्पर्धेमध्ये संतोषची निवड झाली आहे.

blank