37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत मुंडीपार येथे पोळा सण उत्साहात; नंदी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामपंचायत मुंडीपार येथे पोळा सण उत्साहात; नंदी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
19

blank

गोरेगांव– ग्रामपंचायत मुंडीपार येथे पारंपारिक पद्धतीने पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच तान्हापोळा निमित्ताने लहान बालगोपालांसाठी आकर्षक नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक व कलात्मक पद्धतीने सजावट करणाऱ्या पहिल्या पाच नंद्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रम ग्रामपंचायत मुंडीपार आणि गाव तंटामुक्ती समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. विजेतांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.तसेच ग्राम कृषी संघटना मुंडीपारच्या वतीनेही क्रमांक एक ते पाच विजेत्या बालगोपाळांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.सदर कार्यक्रमात सरपंच सौ.प्रेमलता राऊत, उपसरपंच जावेद खान,
तंटामुक्ती अध्यक्ष तिलकभाऊ पारधी, ग्रामपंचायत सदस्य बी.जी. कटरे, सदस्य दिनेश दीक्षित, सदस्य चंद्रशेखर शहारे यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते.गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रम शांतीमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

blank