39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंंतर तिरोडा आगमनप्रसंगी बोपचे यांचे पक्षाच्यावतीने जंगी स्वागत

जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंंतर तिरोडा आगमनप्रसंगी बोपचे यांचे पक्षाच्यावतीने जंगी स्वागत

0
134

blank

चित्रा कापसे/तिरोडा,दि.१५ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त गोंदिया जिल्हा अध्यक्ष रविकांत बोपचे यांचे प्रथम आगमन प्रसंगी तिरोडा शहरात जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शहरातील सहकार नगर चौक ते जनसंपर्क कार्यालय पर्यंत बाईक रॅली काढून, फटाके फोडून, फुलांच्या वर्षावात आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले.

यावेळी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरभर ‘रविकांत बोपचे जिंदाबाद’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो’ अशा घोषणा देत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष श्री रविकांत बोपचे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानत सांगितले की, “पक्षाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देत पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेच्या प्रश्नांवर लढा देणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असेल. सर्वांना सोबत घेऊन संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”

या स्वागत सोहळ्याला मेघाताई बिसेन,ओमप्रकाश रहांगडाले,कैलास पटले,नासिर घाणीवाला,आशिष येरपुडे,युवराज शहारे,विजय बुद्धे,भाग्यश्री केलवतकर,छायाताई टेकाम,मंदाताई टेंभरे,रविंद्र भगत,विश्वनाथ बिसेन , रंजित वालदे, मंगेश गेडाम, जॉनी सैय्यद, टिपू सैय्यद, अकबर शेख, इरफान पटेल, रजनीकांत शरणागत, संजय रहांगडाले, लखन रहांगडाले, रंजित नागपुरे, राजेश तांडेकर, सौ. उषाताई शामकुल, सौ. रिताताई नारनवरे, सौ वनिता डोंगरे, रीनाताई गेडाम, अमोल जाऊळकर, उमाशंकर पटले, श्री सोहनलाल पटले, श्री शुभम नारनवरे, श्री महेश कुकडे, विनोद कुकडे, किशोर कुंभरे, श्री बालकदास कुंभरे,गुलाब कटरे, संकेत शामकुल, अमन नारनवरे, खेमराज रहांगडाले, वासुदेव वैद्य ,ब्रिजलाल परिहार,केतन रामटेके, संतोष रहांगडाले,सुशील बोपचे, डॉ . अनिल पटले, चरण भाजीपाले,शेरान मिर्झा,सुरेश गौधर्य,नितीन पारधी,राजकुमार ठाकरे , सौ. ममता ठाकरे, श्री अनिल रहांगडाले, श्री रंजित श्रीबासरी,राजेश गोटफोडे, आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank