39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा सायकलींग संडे ग्रुपला 400 आठवडे पूर्ण….

सायकलींग संडे ग्रुपला 400 आठवडे पूर्ण….

0
16

blank

गोंदिया :- आज अनेकांना आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे अशातच सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून गोंदिया शहरात 2017 मध्ये काही युवक युवती नी मिळून एक दिन सायकल के नाम चा स्लोगन देत सायकलिंग संडे ग्रुपचे स्थापना करण्यात आली. आज या सायकलिंग संडे ग्रुपला 400 आठवडे पूर्ण झाल्यामुळे गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांनी सहभाग घेत गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना एक सामजिक संदेश देत गोंदिया शहरात सायकलिंग ने भ्रमण करत आपल्या आरोग्य विषयी जनजागृती करण्याचं काम या सायकलींग संडे ग्रुपने केला आहे. या ग्रुपला 400 आठवडे पूर्ण झाले असून या सायकलिंग ग्रुप मध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. आज मोठ्या प्रमाणात आरोग्य विषयक समस्या नागरिकांना होत असतात आणि अशातच आपल्या शारीरिक दुरुस्ती आणि आरोग्य विषयी सगळ्यांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांना सकाळी फिरणे व्यायाम करणे अशा अनेक गोष्टी आपल्या कामाच्या व्यस्तते मुळे जमत नाही तर अशा नागरिकांसाठी गोंदियात जिल्ह्यात काही युवक युतीने एक दिन सायकल के नाम हा उपक्रम सुरू केला या उपक्रमाला सायकलींग संडे ग्रुप असे नाव देण्यात आले. व  ग्रुप द्वारे दर रविवारी सायकलिंग करत असून 20 ते 25 किलोमीटर सायकलिंग करून आपले आरोग्य कसे सुदृढ राहील याकरिता 2017 पासून हा ग्रुप कार्यरत आहे या ग्रुपमध्ये आज अनेक बालकापासून वयोवृद्ध पर्यंत भाग घेत असून आरोग्य विषयी संदेश आणि शारीरिक सुदृढ राहण्याच्या एक मार्ग या ग्रुप द्वारा गेल्या अनेक वर्षापासून देण्यात येत आहेत. छोट्याशा स्वरूपात सुरू झालेला हा ग्रुप आज मोठ्या स्वरूपामध्ये गोंदियात कार्यरत आहे आज या सायकलिंग संडे ग्रुपला निरंतर रविवारच्या दिवशी सायकल चालवून 400 आठवडे पूर्ण झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी या संडे ग्रुपचा अभिनंदन केले व या सायकलिंग ग्रुप सायकल चालवत सहभागी सुद्धा झाले.  या ग्रुप द्वारा आव्हान करण्यात आला आहे की आपलं शारीरिक सुदृढ राखण्यासाठी सायकलचा वापर आठवड्यातून एक दिवस तरी करावा जेणेकरून आपल्या कामाच्या व्यवस्थेतून शारीरिक सुदृढ राहण्यासाठी फार मोलाची मदत होईल.
या वेळी गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर पर्वते, सायकलिंग संडे ग्रुपचे अध्यक्ष मंजू कटरे, सचिव रवी सपाटे व कोषाध्यक्ष विजय येडे, कार्यक्रम संयोजक नरेंद्र बेलगे व दिपाली वाढई यांच्यासह मुन्ना लाल यादवजी,भगीरथ जीवनी , प्रविण हालानी , निखिल कुमार रत्नाकर, राजू सोनवणे, गोपाल रहांगडाले, रोमी गुलाटी,शुभम भीमटे, उदयभान निर्वाण,उमेश माधवानी , डॉ प्रेमकुमार बघेले, मोहित चौधरी, संजय मेश्राम, शिवम पटले, आतिश लोणारकर,वैशाली वैद्य, भारती लाडे,  प्रियंका रत्नाकर,भावना शेंडे, त्रिवेणी उके, तन्वी खापेकर, भाग्यश्री उपरीकर, आदित्य सवालाखे,  मोना निर्वाण, संगीता गायधने, नलिनी जाधव उपस्थित होते.

blank