
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी रॅलीला दाखविली हिरवी झेंडी
परभणी, दि. 3 : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय यांच्यावतीने आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. रॅलीत मोठया संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
रॅलीत एच.आय.व्ही एड्सबद्दल कलापथकाने सादरीकरण केले. देखाव्यांचे आयोजनही करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालय येथून निघालेली रॅली सुभाष रोड, जांब नाका, रायगड कॉर्नर, गणपती चौक ते विसावा कॉर्नर येथे विसर्जित करण्यात आली.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारीका बडे, नोडल अधिकारी डॉ. संजीवन लखमावार, जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र लोलगे, चंद्रकांत यादव, संदीप घोदे, उषा काकडे, अर्जुन राठोड, संतोष कामठे, गायकवाड, आनेराव, होले, धन्वे, तसेच ए.आर.टी सेंटरच्या वरीष्ठ वैद्यकीय अधकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी व सर्व अधिकारी व कर्मचारी व सेतू सेवाभावी संस्था, सामाजिक आर्थिक विकास सेवाभावी संस्था, एन.पी.डी.पी. प्लस (विहान) यांचे प्रतिनिधी, जिल्हा परिचारीका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थीनी, शहरातील विविध कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनचे विद्यार्थी व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी/ विद्यार्थीनी, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
नोडल अधिकारी संजीवन लखमावार यांनी उपस्थितांना एच.आय. व्ही. एड्सबाबत शपथ दिली. यावेळी एच. आय. व्ही. एड्सबाबत मागदर्शनही करण्यात आले.





