39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News भारताच्या राज्यघटनेची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

भारताच्या राज्यघटनेची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

0
31

blank

 यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणाची पुस्तिका  वाचकांच्या भेटीस…
• राज्यपाल महोदयांच्या हस्ते 09 डिसेंबर रोजी प्रकाशन
नागपूर –विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण चर्चा आणि विचारमंथनातून लोकहितासाठीची निर्णय प्रक्रिया हे महाराष्ट्र विधानमंडळाच्या देदीप्यमान वाटचालीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल” या विषयावर मार्च, 2025 अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात झालेली चर्चा आणि या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेले उत्तर, हे या गौरवास्पद परंपरेचा मानबिंदू ठरले. आपल्या राज्यघटनेची आणि त्यायोगे भारतीय संसदीय लोकशाहीची बलस्थाने सोदाहरण स्पष्ट करणारे मुख्यमंत्रीचे हे भाषण आकर्षक पुस्तिका स्वरुपात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोक भवन, नागपूर येथे दिनांक 09 डिसेंबर, 2025 रोजी सायंकाळी 06.30 वाजता समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे.
        या वाचनीय पुस्तिकेस महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची संयुक्त प्रस्तावना लाभली असून राज्यपाल महोदयांचा संदेश, विधानसभा अध्यक्ष महोदयांचे मनोगत, दोन्हीही उप मुख्यमंत्री महोदय, संसदीय कार्यमंत्री यांच्या शुभेच्छा तसेच भाषणातील मुद्दे वाचकांना संदर्भांसह अधिक स्पष्ट व्हावेत या दृष्टीने मुद्देनिहाय संदर्भसूची, मुख्यमंत्री महोदयांच्या राजकीय – सामाजिक जीवनप्रवासातील छायाचित्रे यामुळे पुस्तिकेला विशेष संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र विधिमंडळ संचालित वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे.

blank