
गोरेगांव _ स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचताना समाजातील असंख्य अडचणी, अपमान आणि संघर्षांवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सटवा येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच विनोद पारधी तर मार्गदर्शक म्हणून भागचंद्र रहांगडाले उपस्थित होते. यावेळ प्रमुख अतिथि म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र रहांगडाले, मयुर कोल्हे, राजेश कुंभरे, मुख्याध्यापक त्रिलोक चौधरी, दिगंबर रहांगडाले, भोजराज कटरे, शिक्षिका रेणुका जोशी, शिक्षिका प्रतिभा चौधरी, शिक्षिका गीता बोपचे, शिक्षिका प्राजक्ता चारमोडे, शिक्षक देवेंद्र धपाडे उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सावित्री बाई फुले यांच्या वेशभूषेत येऊन त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन शालेय विद्यार्थ्यांनी केले.





