39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला

0
37

blank

अकोला- काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून अकोट तालुक्यातील मोहोळ या त्यांच्या गावी राजकीय वैमान्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हिदायत पटेल व मोहोळ गावातीलच एका पटेल कुटुंबीयांसोबत त्यांचे बरेच वर्षापासूनचे राजकीय भांडण असून, याच भांडणातून विरुद्ध गटाच्या पटेल नामक एका तरुणाने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यांच्या पोटावर आणि मानेवर चाकूचे प्रचंड घाव झाल्याने, हिदायत पटेल यांना अकोट येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोल्याला हलविण्यात आले असून या चाकू हल्ल्याचा सूत्रधार व त्यामागचं कारण पोलीस शोधत आहेत.

हिदायत पटेल राजकारणातील मोठं नाव असून 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. त्यावेळी दुसऱ्या क्रमांक वरचे मत विधयक पटेल यांनी घेतले असून, सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांचे प्रचंड वर्चस्व आहे. अकोला जिल्हा सहकारी बँकेचे ते संचालक असून, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुद्धा पदाधिकारी आहे. नेमक्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला सर्वांना चकित करणारा असून पोलीस या हल्ल्या मागचा सूत्रधार व हल्ल्याचं कारण शोधत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी अकोट तालुक्यातील मोहोळ येथे दाखल झाले असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

blank