
गोंदिया,दि.05:शैक्षणिक सत्र २०२५-२६ करिता इतर मागास प्रवर्गातील विदयार्थ्यासाठी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुलां-मुलींच्या वसतिगृहांमध्ये तसेच आधार व स्वयंम योजनेतंर्गत १२ वीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
उपरोक्त प्रमाणे शासनाच्या https://hmas.mahait.orgया ऑनलाईन पोर्टलवर शासकीय वसतीगृह असलेल्या जिल्हयासाठी वसतीगृह, पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना यासाठी १२ वी नंतरच्या व्यवसायीक व बिगर व्यवसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युतर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज भरून ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधीत वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी. व तसेच शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील.
शासकीय वसतीगृह उपलब्ध नसलेल्या जिल्हयासाठी पंडित दिनदयाल स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनांचे दिलेल्या शासनाच्या http://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर 15 फेब्रुवारी,2026 पर्यंत अर्ज भरून ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधीत वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी. अधिक माहितीकरीता विदर्भातील सर्व जिल्ह्यातील इमाव, विमाप्र व विजाभज मुलां-मुलींचे शासकीय वसतीगृह,गृहपाल तसेच सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण नागपूर प्रादेशिक विभागाचे उपसंचालक विजय वाकुडकर यांनी केले आहे.





