37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता गोरेगाव येथे तलावात गायीचे अवशेष आढळल्याने खळबळ

गोरेगाव येथे तलावात गायीचे अवशेष आढळल्याने खळबळ

0
72

blank

गोरगाव –  तहसील कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या तलावात दोन गाईची मुंडकी आणि कातडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार आज, 30 मे रोजी सकाळी उघडकीस आला. या घृणास्पद घटनेमुळे गोरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज सकाळी 9:00 वाजेच्या सुमारास काही नागरिकांना तहसील कार्यालयामागील तलावात गाईचे अवशेष तरंगताना दिसले. ही बातमी परिसरात वान्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. घटनेचे गांभीर्य ओळखून गोरगाव पोलीस प्रशासन आणि पशुवैद्यकीय अधिकान्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकान्यांनी सदर अवशेषांचे नमुने (सॅम्पल) तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसेच, पोलिसांनी घटनास्थळाची आणि आजुबाजूच्या परिसराची सखोल पाहणी करून पंचनामा पूर्ण केला आहे. या प्रकरणी गोरगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
या निंदनीय कृत्यामुळे गोरगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.प्रशासनाने दूषित पाण्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तलावाची स्वच्छता करावी आणि वन्यप्राण्यांचा जीव वाचावा तसेच, या घटनेमागे असलेल्या समाजकंटकांचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई कारावी, अशी मागणी गोरगावच्या जनतेकडून केली जात आहे.

blank