39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ आढावा बैठकी खासदारांकडून कर्मचार्यांची कानउघाडणी

आढावा बैठकी खासदारांकडून कर्मचार्यांची कानउघाडणी

0
17

blank

सावली,दि.23 : शासकीय प्रशासकीय विभागाशी संबंधित विविध समस्यांविषयी सांगोपांग विचार विनियम तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने पंचायत समिती सावली येथे गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर आढावा बैठकीत विविध कामांची माहिती जाणून घेताना काही अधिकारी व कर्मचारी यांची टालमटोल करीत असल्याचे लक्षात येताच खासदार नेते यांनी त्यांना धारेवर घेत चांगलीच कानउघाडणी केली.
सदर आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारला पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. मंचावर तहसीलदार उषा चौधरी, संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले, ठाणेदार स्वप्नील धुळे इत्यादी अधिकारी हजर होते.भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल, न.प. बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, भाजपा जिल्हा सचिव मुद्दमवार, जि.प. सदस्य मनिषा चिमूरकर, योगिता डबले, उपसभापती तुकाराम ठिकरे, पं.स. सदस्य विजय कोरेवार, रवी बोलीवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शिक्षण- आरोग्यविषयक समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

blank