39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News कोळसा घोटाळाप्रकरणी मनमोहन सिंग यांना समन्स

कोळसा घोटाळाप्रकरणी मनमोहन सिंग यांना समन्स

0
23

blank

नवी दिल्ली, दि. ११ – कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समन्स बजावले आहे. मनमोहन सिंग यांना कोळसा गैरव्यवहारातील आरोपी म्हणून हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. सिंग यांच्याशिवाय याप्रकरणी उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, पी.सी.पारेख यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. या सर्वांना ८ एप्रिल रोजी हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरीत करण्यात आलेल्या कोळसा खाणपट्ट्यांबाबत सीबीआयने यापूर्वी मनमोहन सिंग यांची चौकशी केली होती.
सन २००५ मध्ये हिंदाल्कोला तालाबीरा-२ या कोळसा खाणपट्ट्याचे वाटप केले गेले होते़ त्या वेळी कोळसा मंत्रालयाचा कार्यभार मनमोहन सिंग यांच्याकडे होता. सीबीआयने याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र त्यानंतर विशेष न्यायाधीश भरत पराशर यांच्या न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा सीबीआयकडे पाठवत पुढील चौकशीचे आदेश दिले़. तत्कालीन कोळसा मंत्री मनमोहन सिंग यांचा विविध पैलूंवर आधी जबाब नोंदवणे योग्य ठरेल, असे सांगत न्यायालयाने सदर प्रकरणी आणखी चौकशीची गरज अधोरेखित केली. त्यानंतर मनमोहन सिंग यांची चौकशी करण्यात आली.

blank