42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ फुले-आंबेडकर आधुनिक युगाचे खरे सत्यशोधक

फुले-आंबेडकर आधुनिक युगाचे खरे सत्यशोधक

0
51

blank

भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मनू हा केव्हाही जिवंत होऊ शकतो, त्याचे प्रत्यंतर आज येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लग्नाच्या मंगलाष्टकातही समाज परिवर्तनाचा विचार मांडला. या दोन्ही महापुरुषांचे विचार काळाच्या पुढे होते. त्यामुळे इतक्या वर्षानंतरही त्यांचे विचार आजही लागू पडतात. फुले आंबेडकर या गुरुशिष्यांनी त्यांच्या ग्रंथ व कार्यातून सदैव सत्याचा म्हणजेच सत्य शोधन्याचा ध्यास घेतला होता. म्हणूनच आधुनिक युगाचे ते खरे सत्यशोधक आहेत, असे मौलीक विचार आंबेडकरी विचारवंत आणि सामाजिक चळवळीच्या अग्रणी डॉ. रुपा कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती भंडाराच्या वतीने आयोजित प्रकाशपर्व २0१५ च्या उद््घाटन समारंभाच्या उद्घाटक म्हणून शनिवारी सार्वजनिक वाचनालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड होते.
प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध आंबेडकरी अभ्यासक व चिंतक डॉ. विकास जांभुळकर म्हणाले, परपंपरागत संस्कृतीमध्ये जातीयता घट्ट रूजल्यामुळे राष्ट्रीयत्वाची भावना पर्यायाने राष्ट्रीय एकात्मतेची भावना कमी झाली. त्यामुळे खर्‍या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकली नाही. महात्मा फुले यांनी सुरु केलेला जाती निर्मूलनाचा व प्रबोधनाचा लढा आंबेडकर यांनी पूर्णत्वास नेला आहे. महात्मा फुले यांनी महाराष्ट्राच्या लेकीसुनांना माणूस बनवून माणसात आणले. परंतु फुले दाम्पत्यांच्या सुनेला मात्र रस्त्यावर बेवारस मृत्यू आला आणि पुणे महानगरपालिकेला त्या बेवारस प्रेताची अज्ञात प्रेत अशी नोंद घ्यावी लागली, ही शोकांतिका आहे. तसेच उजेडाचा पुरेपूर उपयोग घेऊन आपले जीवन प्रकाशमान करून इतरांनाही प्रकाशाचा मार्ग आपण दाखविला पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. अनिल नितनवरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता अमृत बन्सोड म्हणाले, शिवाजी हा रयतेचा जाणता राजा होता. महात्मा फुले यांनीच रायगडावर त्यांची समाधी शोधून काढली. बुद्ध – चार्वाक – कबीर फुले – शाहू – आंबेडकर या प्रकाशशलाखा आहेत. म्हणून या सर्व महापुरुषांच्या विचाराने अंधारातून प्रकाशाकडे नेणारे हे निव्वळ प्रकाशपर्व नाही, तर विचारपर्व सुद्धा आहे.
विचारमंचावर माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, समितीचे अध्यक्ष निशांत राऊत, सचिव अमित उके होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मोरेश्‍वर गेडाम, प्रास्ताविक व परिचय प्रा.दिनेश कोटांगले यांनी तर आभार प्रशांत बडोले यांनी मानले.
कार्यक्रमासाठी निशांत राऊत, किशोर मेश्राम, अमित उके, सुशिल नगराळे, अजय तांबे, असित बागडे, गुलशन गजभिये, अरुण अंबादे, संजय बन्सोड, अक्षय पटेल, आदित्य इलमकर, प्रगती रामटेके, संदेश शेंडे, अभिलाषा शिंगाडे यांनी सहकार्य केले.

blank