42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय निवडणूक काळातील भाजप कार्यकर्त्यांचे निलंबन रद्द प्रदेश अध्यक्ष पाटील यांचे जिल्हाध्यक्षांना पत्र

निवडणूक काळातील भाजप कार्यकर्त्यांचे निलंबन रद्द प्रदेश अध्यक्ष पाटील यांचे जिल्हाध्यक्षांना पत्र

0
1325

blank

गोंदिया, ८ जुलै::::राज्याच्या विधानसभा निवडणूकीत निवडून आलेले अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या सोेबत काम केलेल्या भाजप कार्यकर्त्यांचे पक्षाने निलंबन केले होते. ते प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी ५ जुलै रोजी पक्षाच्या व्यापक हिताचा विचार करुन रद्द केल्याचे घोषीत केले असून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांना त्यांना पक्ष संघटनेत सहभागी करुन घेण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत.
यात पक्षाचे जिल्हा महामंत्री असलेले भाऊराव उके, गोंदिया ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, ओबीसी आघाडी अध्यक्ष अमित बुद्धे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष रतन वासनिक, ग्रामीण मंडळ महामंत्री मुनेश रहांगडाले, पंस सदस्य रामराज खरे, नगरसेवक शिव शर्मा, घनश्याम पानतवने, बेबी अग्रवाल, दीपक बोबडे, नितू बिरिया, जिप सदस्या शैलजा सोनवाने, कमलेश्वरी लिल्हारे यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी दिली आहे.

blank