
गडचिरोली,दि.13ः- भामरागड उपविभागातील पोमके धोडराजच्या हद्दीतील अतिदुर्गम व संवेदनशील असलेल्या भटपार या गावातील मुन्शी देवू ताडो (२८) यास ११ जुलै रोजी नक्षल्यांनी त्याचे मालकीचे शेतामध्ये मशागतीचे काम करीत असताना पळवून नेवून निर्घृणपण खून केला. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराला कंटाळून भटपार येथील नागरिकांनी नक्षलविरोधी आक्रोश रॅली काढून नागरिकांची नक्षल्यांच्या हिंसक कृत्याचा निषेध केला.
नक्षल्यांनी खून केलेला इसम मुन्शी ताडो हा विशेष पोलिस अधिकारी नसून तो व त्याची पत्नी जैनी मुन्शी ताडो हे नक्षल दलममध्ये कार्यरत होते. काही वर्षापूर्वी नक्षली जीवनाला कंटाळून नक्षलवादी स्थानिक आदिवासी बांधवांवर करत असलेल्या अन्याय, अत्याचार तसेच आदिवासींच्या विकासात नेहमीच आडकाठी निर्माण करतात. याचा तिटकारा येवून दोघांनीही नक्षलवादी जीवन सोडून सामान्य आयुष्य जगत होते. असे असताना नक्षल्यांनी केवळ संशयापोटी त्याचा खून केला. त्यामुळे मुन्शी ताडोच्या हत्येमुळे नक्षल्यांचा खरा हिंसक चेहरा पुन्हा जगासमोर आला.
नक्षलवादी हे जल, जगल, जमिनीचे कारण सांगून आदिवासी जततेची दिशाभूत करून आदिवासींना नक्षल सप्ताह साजरा करण्यास भाग पाडतात. तसेच आदिवासींच्या विकास कामात अडथथ निर्माण करतात. जनतेवर आपली दहशत निर्माण व्हावी म्हणून गरीब निष्पाप नागरिकांवर खबरी असल्याचा ठपका ठेवून खून करतात.
नक्षल्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात ५३४ निष्पाप नागरिकांचा खून केला आहे. यापुढे नक्षलवाद्यांना कोणत्याही नागरिकांचा खून करू नये तसेच सप्ताह पाळून हिंसक कारवाई करू नये म्हणून पोमके धोडराज हद्दीतील भरपार येथील नागरीक एकत्र येऊन नक्षल्यांच्या हिंसक कृत्याचा जाहीर निषेध केला.
किष्टापूर नाल्याच्या पूल बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षल्यांच्या या हिंसक कृत्याविरुद्ध तेथील नागरिकांनी विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी पंचक्रोशीतील २२ गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन नक्षल गावबंदी करून पुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेले. त्याच धर्तीवर भटपार येथील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्याविरुद्ध एकवटून जनआक्रोश रॅली काढून निक्षलवादाचा विरोध करीत असल्याचे सांगितले. या जनआक्रोश रॅलीदरम्यान नक्षलवाद मुर्दाबाद, माओवाद मुर्दाबाद अशा नक्षविरोधी घोषणा देत निरपराध नागरिकांच्या खुनाविरुद्ध तीव्र निषेध केला. नागरिकांनी स्वत: पुढकार घेऊन नक्षलल्याविरुद्ध जिल्ह्यातील विविध भागात रॅली काढून निषेध करीत आहे. या नागरिकांचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले आहे. नक्षल्यांच्या हिंसक कारवायांना न जुमानता एकजुटीने विकासाच्या प्रवाहाकडे वाटचाल करणार्या ग्रामस्थांच्या सदैव गडचिरोली पोलिस दल पाठीशी राहील, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी दिली आहे.





