42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News अजगर रस्त्यात आडवा येतो अन् थेट वाघाकडे पाहू लागतो

अजगर रस्त्यात आडवा येतो अन् थेट वाघाकडे पाहू लागतो

एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये जंगलातून जाणाऱ्या वाघाच्या रस्त्यात एक भलामोठा अजगर आडवा येताना दिसत आहे.उत्तर भारतीय वन खात्यामध्ये अधिकारी असणाऱ्या सुशात नंदा यांनी आपल्या ट्विटरवरुन दिलं आहे. नंदा यांनी एक ४४ सेकंदांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये पायवाटेवरुन जाणाऱ्या वाघासमोर अजगर येतो आणि थेट त्याच्याकडे पाहू लागतो असं दृष्य दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना नंदा यांनी, “अजगरासाठी वाघाने आपला रस्ता बदलला” अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडिओ कधी कुठे आणि कोणी काढला आहे यासंदर्भात नंदा यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र व्हिडिओमध्ये काय होतं हे पाहून अनेकांनी तो शेअर केला आहे.

0
566

blank