39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय वंचितआघाडीचे डफळी बजाव आंदोलन

वंचितआघाडीचे डफळी बजाव आंदोलन

0
1290

blank

गोंदिया,दि.१२  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून सार्वजनिक वाहतुकीची साधने बंद करण्यात आली आहेत. जिल्हाबंदी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कामानिमित्त बाहेर पडता येत नाही. त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियम लादून सार्वजनिक वाहतूक सेवा जिल्ह्याबाहेरदेखील सुरू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने बुधवारी (दि.. १२) दुपारी १ च्या सु‘ारास येथील बसस्थानकासमोर ‘डफळी वाजवा‘ आंदोलन केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ार्च ‘हिन्यांपासून सरकारने लॉकडाउन घोषित केले. या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली.
कार्यालये, दुकाने, हॉटेल, बाजारपेठा यासह ज्या‘ुळे लोकांचा आपापसांतील संपर्क क‘ी होईल, अशा प्रकारच्या सर्व व्यवहारांवर निर्बंध घातले होते. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि हळहळू हे निर्बंध हटविण्यात येत आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या गरजेची असलेली एसटीबस वाहतूक अद्याप जिल्ह्याबाहेर सुरू करण्यात आली नाही.
दरम्यान, या चार ‘हिन्यांतील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर प्रतिबंधात्‘क उपाययोजनां‘ध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार, एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरू  करण्याची आवश्यकता असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
तथापि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यविषयक सुरक्षिततेचे निय‘ काय‘ ठेवून सर्व व्यवहार सुरू करावे, जिल्ह्याबाहेर एसटी बससेवा सुरू करावी, जिल्हाबंदी ताबडतोब उठवावी, या मागण्या करीत वंचित बहुजन आघाडीने ‘डङ्कळी वाजवा‘ आंदोलन केले.
आंदोलनात विदर्भ स‘मन्वयक तथा जिल्हाध्यक्ष राज डहाट, सुरेंद्र खोब्रागडे, पी. एस. गजभिये, संतोष खोब्रागडे, परमानंद मेश्राम‘, एन. यू. श्यामकुंवर, दिनेश सोनवने, सुरेश राऊत, करण मानकर, जगदीश कुंजा‘ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

blank