35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ. विनोद अग्रवाल

संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ. विनोद अग्रवाल

0
691

blank

गोंदिया,दि.21ः मागील आठवडाभरापासून जिल्हा संतत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच घरांची पडझड होऊन नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. घराचे पडझड झाल्याने कित्येक कुटुंब उघड्यावर आलेले आहेत. सोबतच नदी आणि नाल्यांच्या काठावर असणाऱ्या गावातही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय शेतातही पाणी भरून असल्याने पिकाचे नुकसान झालेले आहे. यासंबंधी आमदार विनोद अग्रवाल यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे तात्काळ पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करून पूर परिस्थिती उद्भवल्यास शासनाला किंवा आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाला तात्काळ माहिती पुरवण्यास आवाहन केले आहे.

blank