37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ भंडारा 26 रुग्णांना डिस्चार्ज,49 पॉझिटिव्ह तर 03 मृत्यू

भंडारा 26 रुग्णांना डिस्चार्ज,49 पॉझिटिव्ह तर 03 मृत्यू

पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 1046 बरे झालेले रुग्ण 583 क्रियाशील रुग्ण 443 आज 03 मृत्यू एकूण मृत्यू 20

0
788

blank

भंडारा दि. 28- जिल्ह्यात आज 49 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (1046) हजार पार झाली आहे. आज 26 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 583 झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 25, साकोली 06, लाखांदूर 00, तुमसर 11, मोहाडी 05, पवनी 01 व लाखनी तालुक्यातील 01 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 583 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 1046 झाली असून 443 क्रियाशील रुग्ण आहेत. आज 03 रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 20 झाली आहे.
आज 28 ऑगस्ट रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 148 व्यक्ती भरती असून 1187 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून  डिस्चार्ज  देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8129 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 470 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 7659 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

blank