42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय गोंदियात कंगणा राणौतचे पोस्टर जाळून शिवसेनेने नोंदवला निषेध

गोंदियात कंगणा राणौतचे पोस्टर जाळून शिवसेनेने नोंदवला निषेध

0
744

blank

गोंदिया,दि.04ः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने कंगणा राणौतचे पोस्टर जाळून वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला आहे.शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी मुंबईव्देष्टा,मराठी व महाराष्ट्रव्देष्टा अभिनेत्रीने चालते व्हावे अशा घोषणा देत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.येथील यादव चौकात दुपारच्या सुमारास शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्राप्रती व्देष बाळगणार्या व मुंबईला पाकव्याप्त भाग म्हणणार्या अभिनेत्रीला समर्थन करणार्या राजकीय पक्ष व नेत्यांच्याही विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला.blankकंगना राणौतने मुंबईची माफी नाही मागितली तर आम्ही कंगना राणौतच्या सिनेमा गोंदिया जिल्ह्यात प्रर्दशित होऊ देणार नसल्याचेही शिवहरे यांनी म्हटले आहे. कंगना राणौत सारख्या प्रवृत्तीनेच आतंकवाद पोसला आहे. कंगना राणौतने मुंबईबाबत केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यामुळे तिने तात्काळ मुंबई आणि मुंबईकरांची माफी मागावी, असे मुकेश शिवहरे यांनी म्हटले आहे.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे,जिल्हा समान्यक पंकज यादव, उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे,शहर प्रमुख गुड्डू ऊके, उपजिल्हा संघठक अशोक अरखेल,शहर संघटक विनीत मोहिते,उपतालुका प्रमुख पिंटू बावनकर यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

blank